'वारली' नाही जगली पाहिजे'
कम् लति या सा कला' म्हणजे जी आनंद देते ती कला, अशी कलेची व्याख्या केली जाते. कला म्हणजे सौंदर्य, संस्कृती, राग, आनंद, लोभ, तिरस्कार, सुखदु:ख, वेदना या सर्व भावना कलेतून व्यक्त करता येतात. प्रत्येक कलेचा जन्म हा कोणत्या ना कोणत्या संस्कृतीतून होत असतो. अशीच ठाणे जिल्ह्याला परंपरेने लाभलेली आणि आजतागायत जतन केलेली कला म्हणजे 'वारली' चित्रकला होय. वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर जगातील सर्वात महत्त्वाची चित्रशैली आहे. संस्कृती, रूढी, परंपरा आणि कर्मकांड या माध्यमातूनच वारली मूलनिवासी चित्रशैली उदयास आली आहे. ही चित्रशैली टिकवणं एक साधनाच आहे. ज्या प्रमाणे सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे. त्याचप्रमाणे वारली चित्रशैली ही संस्कृती मानली जाते. फार पूवीर्पासून सामूहिकरित्या राहिल्याने समूहशक्तीचे महान दर्शन या संस्कृतीतून दिसून येतं. उंबरगाव, डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, वाडा या तालुक्यातील दूरवरची गावं पाहता आजही परंपरागत निवारे दिसून येतात. अधिवासी म्हणजे मूलनिवासी, गाव-पाड्यातील बहुसंख्य लोक गटागटाने राहतात. त्यांच्या झोपड्यांची रचना पाहता आजही परंपरागत तिथे कमालीची स्वच्छता दिसून येते. बहुधा बरीच घरं, थोड्या उंचावर बांधलेली आढळतात. तर खिडक्या या काही कारव्या काढून तयार केलेले हवेचे झरोके, वर पळसाची पान पेंढा लाऊन छप्पर कयार करतात. या कुडामातीच्या घराच्या भिंतीवर आपल्याला वारली चित्रशैलीची विविध अंग दिसून येतात. प्रत्येक चित्रामध्ये विविध सण, उत्सव, सोहळा याचं चित्रण येतं. यातून त्यांची सांघिक भावना दिसून येते. प्रत्येक कला जन्माला येण्यास काही तरी कारण असतं. इजिप्शियन संस्कृतीत मरणोत्तर जीवनाला महत्त्व देऊन इथे कला जन्मास आली तर रोमन कला जीवन सुखकर होण्यासाठी जगासमोर आली तर वारली चित्रशैलीत या दोन्ही संस्कृतीचा मिलाप दिसून येतो. कारण वारली चित्रकला ही ऐहिक जिवनाचं आणि मरणोत्तर जीवनाचं संगम रूप आहे. वषोर्नुवषेर् चालत आलेली वारली चित्रशैली जपण्याचे प्रयत्न होत आहेत. अनेक आर्ट्स कॉलेजमध्ये या चित्रशैलीचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. ....
Find ud on Facebook
Few Samples
related blogs
Loading...
Click Here To read details~Design & maintain By-AYUSH.