India's global art! proudly tribal art!

Buy Warli Painting Online

Warli Painting

लाखमोलाची वारली!

लाखमोलाची वारली!

वारली पेण्टिंग' हा हल्लीच्या साऱ्याच प्रथितयश चित्रकरांचा आवडीचा विषय. शिकवून काढलेली वारली पेण्टिंग्ज आणि आदिवासींनी साकारलेली पेण्टिंग्ज यातील कलेत आणि कलेतील भावनेत, बराच फरक आढळतो. डहाणू तालुक्यातील वारली पेण्टिंगचे पाइक 'जिव्या सोमा मशे' यांच्या चित्रांचं प्रदर्शन नुकतंच ठाण्यात भरलं आहे. वारली चित्रकलेत विविध प्रकार आढळतात. पण साऱ्यांमध्ये त्यांच्या जीवनाची एक लकब दिसते. त्यांच्या घरांवर काढलेल्या प्रत्येक चित्रात त्यांच्या जीवनशैलीचं, संस्कृतीचं दर्शन घडतं. त्यातील प्राणी, पक्षी, सूर्य, शेतकरी, डोंगर, निसर्ग हे सारं या चित्रांचा अविभाज्य भाग असतात. जिव्या सोमा मशे हा डहाणूतील कलंबी पाड्यात राहणारा आदिवासी. आदिवासी असूनही कोणतंही कलेचं ज्ञान नसूनही हाडाचा चित्रकार. डहाणूतील वारली चित्रांचं ते पाइक गेली ६० वर्षं आपल्या भावना ते या चित्रातून रंगवत आहेत. आपली आई मरण पावल्यानंतर त्यांनी आपल्या भावना चित्रातून व्यक्त करायला सुरुवात केली. कॅनडा, जपान, जर्मनी, इंग्लंड, इटली या देशात त्यांच्या चित्राची प्रदर्शनं भरली. केंद सरकारने १९७० मध्ये खेड्यापाड्यातील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच उपक्रम राबवले. त्यानंतर जिव्या मशे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९७६ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलेसाठी मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. जिव्या सोमा मशे यांनी पाड्यापाड्यात काढलेली चित्रं आता कापडावर अवतरली आहेत आणि ती पाहण्याची संधी आता ठाणेकरांना लाभली आहे. ठाण्यातील नौपाड्यातील हायकू आर्ट गॅलरीत त्याचं प्रदर्शन भरलं आहे. कापडांवर काढलेल्या चित्रांवरही त्यांच्या पाड्यातील मातीचा सुगंध तसंच त्यावर रंगवलेल्या भाताच्या पेस्टमधून तयार केलेला पांढरा रंग ताजा टवटवीत वाटतो. गेल्या वषीर् इटलीत भरलेल्या 'लाइव्ह द हार्ट' या प्रदर्शनात जिव्या मशे यांच्या सुमारे ४० चित्रांपैकी काही हायकू आर्ट गॅलरीत पाहायला मिळत आहेत. या चित्रांची किंमत सुमारे एका लाखापासून पुढे असल्याची माहिती बजाज आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक संदीप प्रभाकर यांनी दिली. मासेमारी करायचं जाळं, त्यातले मासे आणि आदिवासी जीवनशैली याचा सुंदर ताळमेळ त्यांच्या चित्रातून दिसतो. ठाण्यातील कलाप्रेमींना आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडावं,......

under construction!

Warli art

Find ud on Facebook

Few Samples

related blogs

Loading...
Click Here To read details~Design & maintain By-AYUSH.

warli art samples